पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वकृत आरत्या

इमेज
    स्वकृत आरत्या  सोमवारच्या आरत्या  बारा ज्योतिर्लिंगांची आरती ( चाल:आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)   आरती गातो भक्तीने तुज कर्पूरगौरा द्वादशज्योतिर्लिंगनिवासी रुद्रा विश्वंभरा || ध्रु. ||   श्रेष्ठत्वाचा गर्व हराया ब्रह्मा-विष्णूचा शंभू प्रगटे बनुनी अनंत स्तंभ प्रकाशाचा प्रकाश पडला त्या स्तंभाचा ज्या ज्या स्थानांत ज्योतिर्लिंग म्हणुनि स्थाने झाली प्रख्यात || १   || प्रभासक्षेत्री जिथे त्रिवेणी संगम मनोहर सोम सत्ययुगि , त्रेतायुगात रावण लंकेश्वर द्वापारयुगी श्रीकृष्ण करी मंदिर निर्माण ' सोमनाथ ' क्षेत्रात निरंतर वसे उमारमण || २   || कार्तिकेयरोषास हराया महेश अन् पार्वती मल्लिकासुमे अर्पण करुनी गिरिस्थानी राहती म्हणून झाले ज्योतिर्लिंग अन् शक्तीचे स्थान आंध्र प्रदेशी श्रीशैलावर वसे ' मल्लिकार्जुन ' || ३   || अवंतिनगरी वास करीती शिवभक्त