पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन

इमेज
  श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन   १. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेले योग श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायास एकेका योगाचे नाव दिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे असे अठरा अध्याय आहेत. त्यामुळे श्रीमद्भगवद्गीतेत अठरा योग सांगितले आहेत का? शिवाय अध्यायास नाव नसलेल्या बुद्धियोग आणि ज्ञानयोग यांचाही उल्लेख श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आहे. श्रीमद्भगवद्गीतेत खरोखर किती योग सांगितले आहेत, ते पाहू या. १. अर्जुनविषादयोग: सर्व सगेसोयरे युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून अर्जुनाला आता कुळाचा नाश होणार, म्हणून विषाद झाला आहे. २. सांख्ययोग: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे स्वरूप, स्वधर्मानुसार युद्धाची आवश्यकता यांचा ऊहापोह  ३८ व्या श्लोकापर्यंत केल्यानंतर ३९ व्या श्लोकात म्हणतात की हे तुला सांख्यातील ज्ञान सांगितले, आता योगातील ज्ञान ऐक, जे जाणून तू कर्मबंधनातून मुक्त होशील. अशा प्रकारे ३९व्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगण्यास सुरुवात केली आहे.श्लोक ५० मध्ये योगाची व्याख्याही केली आहे 'योग: कर्मसु कौशलम्'. याचा अर्थ 'योग म्हणजे कर्मातील कौशल्य'. कौशल्य कसले ते पुढे स्पष्ट