पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MY OWN QUOTES

इमेज
  MY OWN QUOTES The thoughts are like butterflies  With colors bright  The character is the sun  That gives them the light

संक्षिप्त श्रीसाईसच्चरित

इमेज
 संक्षिप्त श्रीसाईसच्चरित  शिर्डीत एक रोहिला | कुराणपठण करी || त्रासला गाव सारा | बाबा संतुष्ट तरी || अ.३ ||  नूर  मुहम्मद जरी | जळी विसर्जन करी || सारी चित्रे संतांची | परी प्रतिमा बाबांची || सुरक्षित राहिली | मग मुहम्मद अली || नेउनी देई तीस | गुरु दाभोळकरांस || सिद्दीक फाळकेचा | गर्व मक्कायात्रेचा || करिती बाबा हरण | देती त्यास शिकवण || अ.११|| शिरडीत एक वेळी | झाल पाऊस वादळी || बाबांची आज्ञा होता | झाला पाऊस बेपत्ता || अ. ११ || एकदा मशीदीत | आग लागे अवचित || सटका आपटती | बाबा आग विझवती || अ.११ ||                                                                वीरभद्राप्पाला | जन्म सापाचा मिळाला || चनबसाप्पा दीन | राही बेडूक बनून || दोघांच्या कथेतून | बाबा देती समजावून || संपत्तीची आसक्ती | करी आयुष्याची माती || बाबा जेव्हा निजती | वीट उशाशी घेती ||                                    झाडू मारताना कुणी | वीट गेली फुटूनी ||                                    बाबांना जेव्हा कळले | ते दु:खाने बोलले ||                                 'अरेरे, काय झाले | माझे कर्मचि फुटले ||             

बालगीते

इमेज
  बालगीते  मुलांच्या संगोपनामध्ये बालगीतांचे फार मोठे महत्त्व आहे. बालगीतांमधून मुलांचा प्रथम भाषेशी परिचय होतो. बालगीतांतून त्यांचे भाव विश्व तयार होते. यमकांमधून त्यांच्या मनात भाषेचे प्रोग्रामिंग होत जाते आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची पार्श्वभूमी तयार होते. माझ्या मोठ्या  भावाच्या कॅनडा मध्ये असणाऱ्या नातवासाठी तक्ष साठी मी काही बालगीते लिहून पाठवली. त्यांसाठी चित्रेही मीच काढली. ही बालगीते प्राण्यांची ओळख तसेच माहिती करून देण्यासाठी आहेत. ही बालगीते तुमच्या घरातील लहानग्यांना म्हणून दाखवा आणि मला प्रतिक्रिया जरूर पाठवा.     बाबा आणि अमनी  बाबा आणि अमनी होती अमनी नावाची | गरीब मुलगी गुणाची चिंध्या झाल्या कपड्यांच्या | झिपऱ्या झाल्या केसांच्या होती बाबांची लाडकी  | बाबांना भेटायला यायची  |   एक दिवस हट्ट धरला | 'बाबा, रुपैया द्या मला' | बाबा खोटे रागावले | डोळे वटारले | अमनी हिरमुसली | मुसमुसू लागली | बाबांनी जवळ घेतले  |  डोळे तिचे पुसले |  खिशातून रुपया काढला | अमनीच्या हातावर ठेवला |  अमनी खुदकन हसली | बाबांनी पापी घेतली  लहान मुले आवडतात बाबांना | म्हणून करा रोज नमस्कार