पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वकृत काव्यरचना

इमेज
  नसतानाही वारा थरथरतात पाने आठवून रात्रीची मधुर स्वप्ने पांढरे शुभ्र पाखरू भिरभिरते ओढ्यावरून झोंबणाऱ्या गारव्याने पाणी जाते शहारून निरोप घेताना रात्रीचा हळवे होते भुरे आकाश आतुरतेने वाट पाहते कधी दिसेल सूर्यप्रकाश आईने डोळे मिटले तेव्हा आईने डोळे मिटले तेव्हा खरे नाही वाटले वाटले, ते खळखळून हसणे ते गाणी गुणगुणणे  कुठे बरे विरले होती जेव्हा आई तेव्हा वाटायचे किती बावळट ही बाई नाही कळत साध्या गोष्टी हिला तिच्या निरागसपणाचा राग राग केला आता पावलापावलाला येते तिची आठवण आता कळते किती उपयोगी होती तिची शिकवण पण वाटते आईवाचूनही  राहिले पाहिजे चालत आईवाचून खचलो तर व्यर्थ गेली आईची मेहनत आईलाही करायची आहे अनंताची वाटचाल तिच्या आठवणीत कुढलो तर तिचेही अडखळेल पाऊल डेक्कन एक्स्प्रेसची मुशाफिरी लोणावळ्यास अजुनी चिक्कीचा गोडवा आहे करजतला अजुनी बटाटेवड्याचा गंध दरवळतो आहे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वाहनांनी तुडुंब भरला आहे मला मात्र डेक्कन एक्स्प्रेसची मुशाफिरी याद आहे पाऊस पाऊस मनींचे गुज  मला माझ्या जवळ नेणारा माझीचं माझ्याशी ओळख करून देणारा  अलवार आठवणी डोहातून वर आणणारा दुःखाचे कढ उचंबळवून डोळ्यांत

स्वकृत भक्तिरचना

इमेज
  देव-देवतांचे स्मरण  गणेशस्तुती  मस्तकी मुगुट | प्रसन्न वदन ||  मंगल ते ध्यान | मोरयाचे || १ || परशू नि पाश | धरिले करांत ||  भक्तांचे रक्षण | करावया || २ || तिसऱ्या करात | मोदक शोभतो ||  आशिर्वाद देतो | चौथा हात || ३ || सदैव स्मरता | विघ्नविनाशन ||  असा गजानन | मोक्ष देई || ४ || कार्तिकेयस्तुति   स हा मुखांचा स्वामी जगाचा                                                                                                  गणेशभ्राता सुत जो शिवाचा   जगी पातला तारका संहराया   नमस्कार माझा तया कार्तिकेया सूर्यस्तुती तुझा स्पर्श होतो जेव्हा नभाला अंधार सारा जातो लयाला देतोस ऊर्जा विश्वास साऱ्या नमस्कार माझा तुला सूर्यराया श्रीराम स्तुती   धन्य तो रामराया | केली मुक्त अहिल्या || तारिले त्रैलोक्याला | मारुनी रावणाला || हनुमान स्तुती   धन्य मारुतीराया | सीतामाईस शोधिले || द्रोणागिरी आणूनीया | लक्ष्मणास वाचविले || श्रीअंगदस्तोत्र श्रीगणेशाय नमः गौरीपुत्र गणेशाला करुनी नम्र वंदन अंगदस्तोत्र हे गातो भक्तिभावे नमूनीया || १ || पुत्र श्रेष्ठ वालीचा असे अंगद महाबली रामाने वधिता वाली