पोस्ट्स

संजलवहिनींचा आगळा छंद

इमेज
संजलवहिनींचा आगळा छंद २०२२ च्या ख्रिस्मसमध्ये माझ्या मावस भावाने, सुशीलने त्यांचा मेल्बर्नला जाण्याचा बेत सांगितला आणि आम्हाला येण्याबद्दल विचारले. आम्ही याआधी मेल्बर्नला गेलो नसल्याने आम्हीसुद्धा येण्याचे कबूल केले. सुशील, त्याची पत्नी माधवी, मी आणि माझी पत्नी वर्षा, असे आम्ही चौघे जण मेल्बर्नला पोहचलो. मेल्बर्नला सुशीलचे मित्र किशन भट्टी आणि त्यांची पत्नी संजल यांची भेट झाली. किशन भाई आणि संजलवहिनी अतिशय प्रेमळ दांपत्य.   संजलवहिनी मराठी परंतु किशनभाई काश्मीरी.   माझी व वर्षाची त्यांच्याशी पूर्वीची ओळख नसतानाही ते आमच्याशी अतिशय प्रेमाने वागले. त्यांनी आम्हा सर्वांचे खूप चांगले आदरातिथ्य केले. किशनभाई आणि संजलवहिनी   दुसऱ्या दिवशी आमचा मेल्बर्नमध्ये बीचवर जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे मी, वर्षा, सुशील, माधवी आणि संजलवहिनी, असे पाच जण निघालो. परंतु माधवीची अर्ध्या रस्त्यात तब्येत बिघडल्याने आम्हाला परत यावे लागले. भारतामध्ये डिसेंबर थंडीचा , परंतु ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याचा महिना. त्या दिवशी खूपच कडक ऊन होतं.  आम्ही घरीच गप्पा मारत बसलो. मग संजलवहिनींनी मुलाच्या, करणच्या,   ल

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

इमेज
 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत साधे आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व होते. आम्ही भावंडे त्यांना अण्णा म्हणत असू. त्यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते.  आम्हा मुलांना त्यांनी अतिशय कष्ट करून  करून लहानाचे मोठे केले. आम्हाला सतत त्यांच्या आठवणी येत असतात. या साऱ्या आठवणी एका ठिकाणी संकलित करून ठेवाव्या या हेतूने आम्हा भावंडांनी त्या जशा आठवल्या तशा येथे कथन केल्या आहेत.

श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन

इमेज
  श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन   १. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेले योग श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायास एकेका योगाचे नाव दिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे असे अठरा अध्याय आहेत. त्यामुळे श्रीमद्भगवद्गीतेत अठरा योग सांगितले आहेत का? शिवाय अध्यायास नाव नसलेल्या बुद्धियोग आणि ज्ञानयोग यांचाही उल्लेख श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आहे. श्रीमद्भगवद्गीतेत खरोखर किती योग सांगितले आहेत, ते पाहू या. १. अर्जुनविषादयोग: सर्व सगेसोयरे युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून अर्जुनाला आता कुळाचा नाश होणार, म्हणून विषाद झाला आहे. २. सांख्ययोग: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे स्वरूप, स्वधर्मानुसार युद्धाची आवश्यकता यांचा ऊहापोह  ३८ व्या श्लोकापर्यंत केल्यानंतर ३९ व्या श्लोकात म्हणतात की हे तुला सांख्यातील ज्ञान सांगितले, आता योगातील ज्ञान ऐक, जे जाणून तू कर्मबंधनातून मुक्त होशील. अशा प्रकारे ३९व्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगण्यास सुरुवात केली आहे.श्लोक ५० मध्ये योगाची व्याख्याही केली आहे 'योग: कर्मसु कौशलम्'. याचा अर्थ 'योग म्हणजे कर्मातील कौशल्य'. कौशल्य कसले ते पुढे स्पष्ट

स्वकृत आरत्या

इमेज
    स्वकृत आरत्या  सोमवारच्या आरत्या  बारा ज्योतिर्लिंगांची आरती ( चाल:आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)   आरती गातो भक्तीने तुज कर्पूरगौरा द्वादशज्योतिर्लिंगनिवासी रुद्रा विश्वंभरा || ध्रु. ||   श्रेष्ठत्वाचा गर्व हराया ब्रह्मा-विष्णूचा शंभू प्रगटे बनुनी अनंत स्तंभ प्रकाशाचा प्रकाश पडला त्या स्तंभाचा ज्या ज्या स्थानांत ज्योतिर्लिंग म्हणुनि स्थाने झाली प्रख्यात || १   || प्रभासक्षेत्री जिथे त्रिवेणी संगम मनोहर सोम सत्ययुगि , त्रेतायुगात रावण लंकेश्वर द्वापारयुगी श्रीकृष्ण करी मंदिर निर्माण ' सोमनाथ ' क्षेत्रात निरंतर वसे उमारमण || २   || कार्तिकेयरोषास हराया महेश अन् पार्वती मल्लिकासुमे अर्पण करुनी गिरिस्थानी राहती म्हणून झाले ज्योतिर्लिंग अन् शक्तीचे स्थान आंध्र प्रदेशी श्रीशैलावर वसे ' मल्लिकार्जुन ' || ३   || अवंतिनगरी वास करीती शिवभक्त