संजलवहिनींचा आगळा छंद

संजलवहिनींचा आगळा छंद

२०२२ च्या ख्रिस्मसमध्ये माझ्या मावस भावाने, सुशीलने त्यांचा मेल्बर्नला जाण्याचा बेत सांगितला आणि आम्हाला येण्याबद्दल विचारले. आम्ही याआधी मेल्बर्नला गेलो नसल्याने आम्हीसुद्धा येण्याचे कबूल केले.

सुशील, त्याची पत्नी माधवी, मी आणि माझी पत्नी वर्षा, असे आम्ही चौघे जण मेल्बर्नला पोहचलो.

मेल्बर्नला सुशीलचे मित्र किशन भट्टी आणि त्यांची पत्नी संजल यांची भेट झाली. किशन भाई आणि संजलवहिनी अतिशय प्रेमळ दांपत्य.   संजलवहिनी मराठी परंतु किशनभाई काश्मीरी.   माझी व वर्षाची त्यांच्याशी पूर्वीची ओळख नसतानाही ते आमच्याशी अतिशय प्रेमाने वागले. त्यांनी आम्हा सर्वांचे खूप चांगले आदरातिथ्य केले.



किशनभाई आणि संजलवहिनी  

दुसऱ्या दिवशी आमचा मेल्बर्नमध्ये बीचवर जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे मी, वर्षा, सुशील, माधवी आणि संजलवहिनी, असे पाच जण निघालो. परंतु माधवीची अर्ध्या रस्त्यात तब्येत बिघडल्याने आम्हाला परत यावे लागले.

भारतामध्ये डिसेंबर थंडीचा , परंतु ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याचा महिना. त्या दिवशी खूपच कडक ऊन होतं. 

आम्ही घरीच गप्पा मारत बसलो. मग संजलवहिनींनी मुलाच्या, करणच्या,   लग्नाचा व्हिडिओ  दाखवला.

त्या वेळी लग्नाच्या व्हिडिओमध्ये संजलवहिनी इंग्रजीमध्ये कविता म्हणताना दिसल्या. मी कवितेची तारीफ केली. त्या वेळी त्यांनी सांगितलं की ही कविता त्यांनी स्वतः मुलावर लिहिली आहे. 

मग त्यांनी फाइल उघडून त्यांनी लिहिलेल्या आणखी कविता दाखवल्या. त्यांच्या कविता हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत. त्यामध्ये हिंदीत एक कविता किशनभाईंवरही आहे. मी किशनभाईंना म्हटलं, 'आप बहुत लकी हो, कि तुमपर किसी ने कविता लिखी है, और वोभी तुम्हारे बीबीने.' किशन भाई साहजिक हसले.

कुणाच्या घरी वाढदिवस किंवा कुठला समारंभ असला, की संजलवहिनींचा छंद माहीत असणारे लोक त्यांना कविता बनवण्यास सांगतात. संजलवहिनीसुद्धा आह्वान स्वीकारून प्रसंगानुरूप छानदार कविता बनवतात. ज्या व्यक्तीवर कविता लिहिली, त्यांच्या गुणविशेषांचे सूक्ष्म निरीक्षण, सर्वांना समजणारी संभाषणातील हिंदी आणि इंग्रजी अशी संमिश्र भाषा आणि चटपटीत यमकांची योजना  यांमुळे त्यांच्या कविता समारंभात सर्वांची वाहवा मिळवतात.

मला या आगळ्या छंदाचं खूप कौतुक वाटलं. म्हटलं, 'बरं झालं आपला बीचवर जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. नाहीतर तुमचा हा छंद मला समजलाच नसता.'

मलासुद्धा भाषेची थोडीफार आवड आहे हे कळल्यावर आता कविता लिहिली की इंडिपेंडंट ओपिनियनसाठी संजलवहिनी  कविता माझ्याकडे पाठवतात. मी कवितेचा मूळ आशय बदलणार नाही, यांची काळजी घेत थोडे शब्द इथेतिथे करतो.

गेल्या वर्षी दिव्याच्या, संजलवहिनींच्या सुनेच्या आईस , म्हणजे संजलवहिनींच्या विहीणीस देवाज्ञा झाली. त्या वेळी संजलवहिनींनी लिहिलेली कविता खाली दिली आहे-

Raji, a person of rare stature:

The memorable event in Karan-Divya’s life was staged ,

On the day, they both got engaged,

When we met Raji, a person with the rare stature,

With the cool, calm and sweet nature.

She was ready to help others with no expectation, 

Busy with the social work, her passion,

She was intelligent and artistic,

Who did her work which was filled with a magic.

On the seashore, she loved walking,

Speechless, as if meditating.

Thus was the life, smooth and steady,

But suddenly a cloud made it shady.

Nobody had expected what befell,

When suddenly Raji bade us farewell,

The God gave her a short life, unfortunately,

And we are all standing at a turn of life, so tricky. 

Raji’s memories will never part,

We will always nurture them in our heart.

Paddy, Divya, Manju,  do not feel alone, 

We are always there, just grab a phone.

या कवितेवरून संजलवहिनींनी विहिणीच्या गुणविशेषांचं निरीक्षण आणि मनापासून केलेलं कौतुक  दिसून येतं. संजलवहिनींच्या विहिणीचा आत्मा हे कौतुक ऐकून समाधान पावला असेल असं मला वाटलं.

मी असा छंद आतापर्यंत पाहिला नव्हता. संजलवहिनींच्या आगळ्या छंदास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला संजलवहिनींचा छंद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

आईसाठी पान