रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

Hitchcock Vintage DVDs

 

The Skin Game



हिलक्रिस्टची मोठी इस्टेट हॉर्नब्लोअर खोट्या एजंटमार्फत लिलावात विकत घेतो. या इस्टेटीवर फँक्टरी उभारण्याची योजना असते. हिलक्रिस्टला आपली इस्टेट लबाडीने खरेदी केल्याचा राग असतो. शिवाय आपल्या इस्टेटचा औद्योगिक कारणासाठी वापर होण्यास त्याचा विरोध असतो. त्यामुळे हिलक्रिस्ट हॉर्नब्लोअरची गरोदर सून क्लो हिच्या विवाहापूर्वीचे एक प्रकरण उकरून काढतो. हॉर्नब्लोअर त्यामुळे घाबरतो आणि या प्रकरणास प्रसिद्धी न देण्याच्या अटीवर करार रद्द करतो. परंतु या प्रकरणाची वाच्यता होतेच आणि क्लोच्या पतीला चार्ल्सला ही ते कळते. क्लो त्यामुळे तळ्यामध्ये जीव देते. हॉर्नब्लोअर त्यामुळे हिलक्रिस्टला सूड घेण्याची धमकी देतो. चित्रपटाच्या शेवटी इस्टेटीवरील कापलेले एक झाड पडताना दाखवले आहे

Rich & Strange




03/01/2023 आज दादाने दिलेली हिचकॉकची तिसरी डी व्ही डी Rich and Strange पाहिली. कथा थोडक्यात अशी आहे- फ्रेड आणि एमिली हे जेमतेम परिस्थितीत राहणारे जोडपे श्रीमंतीची स्वप्ने पाहत असतात. त्यांना वारसा हक्कापोटी काही पैसे मिळतात. त्यामुळे ते जहाजाने जगप्रवासाला जाण्यास निघतात. वाटेत फ्रेड एका नकली राजकुमारीच्या नादी लागून तिच्यावर पैसे उधळतो. एमिलीचे एका कमांडरबरोबर प्रेमप्रकरण चालू होते. पूर्ण प्रवास झाल्यावर त्यांचे पैसे संपतात. म्हणून ते एका स्वस्तातील जहाजाने परत जायचे ठरवतात. हे जहाज वाटेत फुटते. एका चिनी जहाजातील लोक त्यांना वाचवतात आणि ते जेमतेम घरी येतात. पैशापाठी सुख येतेच असे नाही, याची त्यांना जाणीव होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत...