बुधवार, १९ जून, २०२४
नानाकाका
गुरुवार, २१ मार्च, २०२४
श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन
श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन
१. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेले योग
श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायास एकेका योगाचे नाव दिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे असे अठरा अध्याय आहेत. त्यामुळे श्रीमद्भगवद्गीतेत अठरा योग सांगितले आहेत का? शिवाय अध्यायास नाव नसलेल्या बुद्धियोग आणि ज्ञानयोग यांचाही उल्लेख श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आहे.
श्रीमद्भगवद्गीतेत खरोखर किती योग सांगितले आहेत, ते पाहू या.
१. अर्जुनविषादयोग: सर्व सगेसोयरे युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून अर्जुनाला आता कुळाचा नाश होणार, म्हणून विषाद झाला आहे.
२. सांख्ययोग: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे स्वरूप, स्वधर्मानुसार युद्धाची आवश्यकता यांचा ऊहापोह ३८ व्या श्लोकापर्यंत केल्यानंतर ३९ व्या श्लोकात म्हणतात की हे तुला सांख्यातील ज्ञान सांगितले, आता योगातील ज्ञान ऐक, जे जाणून तू कर्मबंधनातून मुक्त होशील. अशा प्रकारे ३९व्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगण्यास सुरुवात केली आहे.श्लोक ५० मध्ये योगाची व्याख्याही केली आहे 'योग: कर्मसु कौशलम्'. याचा अर्थ 'योग म्हणजे कर्मातील कौशल्य'. कौशल्य कसले ते पुढे स्पष्ट केले आहे की 'स्वत:स बंधनकारक न होऊ देता कर्म करणे.'
यानंतर भगवान श्रीकृष्ण १. वेदांचे त्रिगुणांनी युक्त स्वरूप २. फलाची आसक्ती सोडून कर्म करण्याची आवश्यकता ३. कर्मापेक्षा बुद्धियोगाची श्रेष्ठता, यांचा ऊहापोह करतात.
३. कर्मयोग:-या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन प्रश्न विचारतो की, 'बुद्धी जर कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगतोस तर मग या घोर कर्मात माझे नियोजन तू कशासाठी करीत आहेस?'
या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण कर्माचे महत्त्व सांगतात. यामध्ये ते स्पष्ट करतात की १. नेमून दिलेले कर्म करणे चांगले आहे २. कर्म यज्ञासाठी करावे ३. कर्म अनासक्तपणे करावे.
४. कर्मसंन्यासयोग:- या अध्यायात भगवान श्रीकृष्ण कर्म त्यागणे योग्य नसून कर्मफलाचा त्याग केला पाहिजे असे प्रतिपादन करतात. या अध्यायात - १. कर्म, विकर्म आणि अकर्म या संज्ञा स्पष्ट करून त्यांमध्ये काय फरक आहे ते सांगितले आहे. २. यज्ञाची कल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार आणि महत्त्व सांगितले आहे. ३. ज्ञानाचे महत्त्व विशद केले आहे.
५. संन्यासयोग:- या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन प्रश्न विचारतो की,'एकदा तू मला कर्मापासून संन्यास सांगतोस, पुन्हा योगाची प्रशंसा करतोस, तर दोन्हींपैकी एक काय हितकारक ते मला सांग.
वास्तविक भगवान श्रीकृष्णांनी कर्मापासून संन्यास कुठेच सांगितला नाही. तरीसुद्धा अर्जुनाने असा प्रश्न विचारला आहे. यावर स्पष्टीकरण देताना भगवान श्रीकृष्ण कर्मयोग आणि संन्यास दोन्ही हितास कारक असले तरी कर्मयोगास विशेष महत्त्व असल्याचे सांगतात.
या अध्यायात भगवान श्रीकृष्ण १. संन्यास म्हणजे काय आणि संन्यासी कोणास म्हणावे २. ब्रह्म, ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मनिर्वाण, यांविषयी स्पष्टीकरण देतात.
६. ध्यानयोग:-पाचव्या अध्यायातील विषय चालू ठेवताना भगवान श्रीकृष्ण योगी कोणास म्हणावे आणि योग्याची लक्षणे काय ते स्पष्ट करतात.
श्लोक १० ते ३२ मध्ये योगाभ्यासाची प्रक्रिया विस्ताराने सांगितली आहे. त्यामुळेच या अध्यायाला ध्यानयोग असे नाव देण्यात आले असावे.
योगापासून जो विचलित होतो, तो कुठल्या गतीस जातो, या अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण असा साधक चांगल्या गतीला जातो याची ग्वाही देतात.
७. ज्ञानविज्ञानयोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्णांची अपर आणि पर प्रकृती, त्रिगुणांचे स्वरूप, भक्तांचे प्रकार कुठले याविषयी माहिती दिली आहे.
८. अक्षरब्रह्मयोग:-या अध्यायात ब्रह्म आणि अध्यात्म, अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ या संज्ञा स्पष्ट केल्या आहेत. अक्षयपदाची प्राप्ती कशी होते, देहत्यागानंतर योगी केव्हा ब्रह्मपदास जातात आणि केव्हा पुनर्जन्म घेतात, यांविषयी माहिती दिली आहे.
९. राजविद्याराजगुह्ययोग:-या अध्यायामध्ये भूते आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संबंध स्पष्ट केला आहे.
१०. विभूतियोग:-या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या निरनिराळ्या विभूती सांगितल्या आहेत.
११. विश्वरूपदर्शनयोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे वर्णन आहे.
१२. भक्तियोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्ण १ ते ५ या श्लोकांमध्ये अव्यक्ताची उपासना म्हणजे काय ते स्पष्ट करतात. श्लोक ६ ते १२ मध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांची उपासना कशी करावी ते स्पष्ट करतात. श्लोक १३ ते २० मध्ये भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत.
१३. क्षेत्रक्षेत्रज्ञयोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, पुरुष आणि प्रकृती या संज्ञा स्पष्ट केल्या आहेत.
१४. गुणत्रयविभागयोग :- या अध्यायात त्रिगुणांचे स्वरूप आणि त्रिगुणातीताची लक्षणे स्पष्ट केली आहेत.
१५. पुरुषोत्तमयोग:- या अध्यायात भगवान श्रीकृष्णांचे परम पद, जीवभूत आणि त्याचे स्वरूप सांगितले आहे. केवळ श्लोक १२ ते २० मध्ये भगवान श्रीकृष्णांचे पुरुषोत्तम स्वरूप म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे.
१६. दैवासुरसम्पद्विभागयोग:-या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुर संपत्ती म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे. संपत्ती म्हणजे गुण होत.
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३
स्वकृत आरत्या
स्वकृत आरत्या
सोमवारच्या आरत्या
बारा ज्योतिर्लिंगांची आरती
(चाल:आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)
|
|
आरती गातो भक्तीने तुज कर्पूरगौरा द्वादशज्योतिर्लिंगनिवासी रुद्रा विश्वंभरा || ध्रु.|| |
|
|
श्रेष्ठत्वाचा गर्व हराया ब्रह्मा-विष्णूचा शंभू प्रगटे बनुनी अनंत स्तंभ प्रकाशाचा प्रकाश पडला त्या स्तंभाचा ज्या ज्या स्थानांत ज्योतिर्लिंग म्हणुनि स्थाने झाली प्रख्यात || १ || |
|
|
प्रभासक्षेत्री जिथे त्रिवेणी संगम मनोहर सोम सत्ययुगि, त्रेतायुगात रावण लंकेश्वरद्वापारयुगी श्रीकृष्ण करी मंदिर निर्माण 'सोमनाथ' क्षेत्रात निरंतर वसे उमारमण || २ || |
|
|
कार्तिकेयरोषास हराया महेश अन् पार्वती मल्लिकासुमे अर्पण करुनी गिरिस्थानी राहती म्हणून झाले ज्योतिर्लिंग अन् शक्तीचे स्थान आंध्र प्रदेशी श्रीशैलावर वसे 'मल्लिकार्जुन' || ३ || |
|
|
अवंतिनगरी वास करीती शिवभक्त ब्राह्मण छळण्या त्यांना मत्त जाहला राक्षस दूषण वधून त्याला वास करीती जेथे मदनहर उज्जैनमधिल पावन स्थळ 'महाकालेश्वर' || ४ || |
|
|
नर्मदेत मांधाता द्वीप ओंकाराकार भव्य मंदिरी वास करीती 'ओंकारेश्वर' विंध्यपर्वताच्या भक्तीने प्रसन्न होऊन भक्तरक्षणा राहती तिथे उदार पंचानन || ५ || |
|
|
पांडव निघती शिवा शोधण्या पापक्षालना हिमालयामधि मिळती महेश वृषरूपे त्यांना भक्तरक्षणा तेच जाहले अक्षय शिवतीर्थ पवित्र मंदिर हिमालयात 'केदारनाथ' || ६ || |
|
|
ब्रह्मदेव देता वर त्रिपुरासुर झाला मत्त जिंकुनिया देवांना केले सकल जनां त्रस्त त्रिनेत्रधारी संहारितसे जेथे त्रिपुरासुर भीमेसन्निध सह्यगिरीवर स्थळ 'भीमाशंकर' || ७ || |
|
|
लिंग बनुनि शिव रावणासवे निघती लंकेस वदती लिंग तयाला भूमीवर न ठेवण्यास युक्तीने परि लिंग भूवरी ठेवी गजानन 'बैद्यनाथ' ज्योतिर्लिंग दिव्य तेच स्थान || ८ || |
|
|
दारुक दानव मातला करी सर्वांना त्रस्त शिवमंत्रास जपाया सांगे सुप्रिया शिवभक्त भक्तरक्षणा जिथे राहिले नागेश गंगाधर क्षेत्र शिवाचे तेच जाहले मंगल 'नागेश्वर' || ९ || |
|
|
शिव नि पार्वती तप करण्याला क्षेत्र निर्मितात मणिकर्णिका आणिक पीठे जिथे असंख्यात मोक्ष लाभतो जीवा करिता जिथे देहत्याग 'काशी विश्वेश्वर' गंगातीरी ते ज्योतिर्लिंग || १० || |
|
|
दक्षिणगंगा गोदावरिचा होइ ज्यात उगम त्या ब्रह्मगिरीतळी विलसते मंदिर मनोरम ब्रह्मा, विष्णू, शंकररूपे मंदिरी उमापती म्हणुनि 'त्र्यंबकेश्वर' नावाने क्षेत्राची ख्याती || ११ || |
|
|
दक्षिणेस श्रीराम पातले मुक्तिस सीतेच्या युद्धामध्ये दशाननावर विजय प्राप्त करण्या स्थापुनि पार्थिव लिंग करीती पूजन शिवाचे प्रसिद्ध झाले ते 'रामेश्वर' गृह चूडामणिचे || १२ || |
|
|
घुष्मेच्या भक्तीला मृत्युंजय शिव पावून मृत पुत्राला तिचिया जेथे देऊनी जीवन भक्तमनोरथ पुरविण्या राहति जेथे निरंतर वेरुळजवळी दयानिधीचे 'घृष्णेश्वर' मंदिर || १३ || |
|
|
करीतसे जो यात्रा बारा ज्योतिर्लिंगांची हृदयी दृढ होऊनी भक्ती कारुण्यसिंधुची भवभयातुनी, जन्ममृत्युतुनि होउनिया मुक्ती सुखदायी अक्षय शिवधामाची होइ त्यास प्राप्ती || १४ || |
मंगळवारच्या आरत्या
अष्टविनायकांची आरती
(चाल: आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)
आरति गातो सद्भावे तुजला गजानना
अष्टविनायकरूपे येउनि तारिसि भक्तांना || ध्रु.||
मयुरारूढ गणेशे वधिला सिंधुदैत्य क्रूर
ब्रह्म्याने निर्मिले म्हणूनी गणेशमंदिरगोसावी मोरयांस निशिदिन ध्यास असे ज्याचा
'मोरेश्वर' तो प्रथम विनायक असे मोरगावचा || १ ||
नेइ गणासुर कपिलऋषींचे 'चिंतामणि' रत्न
मिळवी गणेश पुन्हा रत्न ते गणासुरा मारुनद्वितिय विनायक 'चिंतामणि'चे ते स्थळ थेऊर
माधवांस थोरल्या पेशव्यां भक्ति ज्याचि फार || २ ||
'सिद्धिविनायक" सिद्धीदाता तो सिद्धटेकचा
तृतिय विनायक प्रभावशाली उजव्या सोंडेचा || ३ ||
मातला त्रिपुरासुर पराजित केले देवांस
पाठ करुनिया संकटनाशन गणेशस्तोत्रास
जिथे मारितो त्रिपुरासुरा गिरिजेचा नाथ
रांजणगावी 'महागणपती' विनायक चतुर्थ || ४ ||
इंद्रपदास्तव यज्ञ करितसे अभिनंदन राया
यज्ञ मोडण्या इंद्र निर्मितो विघ्नासुर दैत्या
गणेशास प्रार्थिता तयाने दैत्यास हरविले
ओझरचा 'विघ्नेश्वर' तेची तीर्थक्षेत्र झाले || ५ ||
लेण्याद्रीवरि अखंड पाषाणामध्ये मंदिर
सभामंडपा स्तंभाचाही नाही आधार
तप करिते पार्वती लाभण्या सुत गणेश म्हणुनी
विनायक सहावा 'गिरिजात्मज' शोभे त्या स्थानी || ६ ||
गणेश प्रसन्न गृत्समदाच्या होउनि भक्तीस
भक्तमनोरथ पुरविण्या जिथे नित्य करी वास
गणेशमूर्ती स्वयंभू जिथे मिळे जलाशयी
महड गावचा 'वरदविनायक' तेथे सुखदायी || ७ ||
सूर्य उगवता किरणे ज्याचे घेती मुखदर्शन
हीरकमंडित नेत्र जयाचे दिसती शोभून
नाम भक्त बल्लाळाचे धारण करी निरंतर
आठवा विनायक पालीचा तो बल्लाळेश्वर || ८ ||
अष्टविनायकयात्रा नियमित जीवनात करिता
अष्टविनायकरूपी गणेश चित्तामधि स्मरता
गणेशकृपा होई निरंतर होई यशप्राप्ती
जीवनयात्रा सफल होउनी मोक्ष मिळे अंती|| ९ ||
गुरुवारच्या आरत्या
श्रीपादवल्लभांची आरती
जय देव जय देव श्रीपादवल्लभा
उजळतसे विश्वाला तव तेजप्रभा || ध्रु.||
पिठापूर ग्रामाचे भाग्य उदेले
अप्पलराज-सुमतीला पुत्ररत्न झाले
ब्रह्मा-विष्णु-शिवांचे रूप मनोहर
श्रीदत्तांचा झाला आदिम अवतार || १||
दूर करुनि निज बंधूंचे व्यंग
मातापित्यांचे फेडियले पांग
वृद्ध ब्राह्मण पोटदुखीने त्रस्त
तव कृपेने झाला पीडेतुनि मुक्त || २ ||
वास्तव्याने कुरवपुर केले पावन
दिधले भक्तांलागी दत्तदर्शन
'श्रीपाद' नामाचा करिता नित्य जप
काळाचे भय नुरते नको दुजे तप || ३ ||
श्रीनवनाथांची आरती
(चाल: आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)
आरती नवनाथां गातो जोडुनि उभय करां
नवनारायण भक्तोद्धारा घेती अवतारा ।। धृ।।
कवि नारायण 'मच्छिंद्रनाथ' पहिला अवतार
जन्मति उदरातुनि माशाच्या, करती तप घोर
प्रसन्न होउनि दत्तात्रेये दिधले वरदान,
'नाथसंप्रदायाला वत्सा करशिल स्थापन' || १ ||
सरस्वती या ब्राह्मणस्त्रीला पुत्रप्राप्ति होण्या
दिव्य विभूती मच्छिंद्रनाथ देती मंत्रुनिया
सरस्वतीने शेणात परी टाकता विभूती
हरि नारायण "गोरक्षनाथ' तीतुन अवतरती || २ ||
गोरक्षनाथ करीत असता जप संजीवनिचा
मुले सांगती बनवायाला पुतळा मातीचा
संजीवनि मंत्राने पुतळा जीवित होऊन
'गहिनी' नामे अवतरती करभजन नारायण || ३ ||
सोमयाग यज्ञास बृहद्रव राजाने केले
अंतरिक्ष नारायण अग्नीमध्ये प्रवेशले
यज्ञाच्या राखेमधि बालक दिव्य दिसुनि आले
भूवरि 'जालंदर' हे चौथे नाथ प्रगट झाले || ४ ||
अंश ब्रह्मदेवाचा राही हत्तीच्या कानी
प्रबुद्ध नारायण राहतसे प्रवेश त्यात करुनी
कानिफरूपे षोडश वर्षी होई अवतार
जालंदरांस आणिक लाभे शिष्य एक थोर || ५ ||
सूर्यपुत्र 'भर्तरी' म्हणूनी भूवरि अवतरले
नाथ सहावे म्हणून धृमीन नारायण आले
भार्याविरहामधे भर्तरी पडता गुंतून
गोरक्षनाथ मुक्त करी त्या मोहबंधनातुन || ६ ||
रेवातीरी रेतीमध्ये ब्रह्मदेव-अंश
ईश चमसनारायण करुनी तीमधे प्रवेश
नाथ सातवे रेवणसिद्ध घेती अवतार
दत्तकृपेने जाहले जगी सिद्ध एक थोर || ७ ||
सर्पिणीच्या उदरी राही ब्रह्मदेव-अंश
ऐरहोत्रनारायण करुनी त्यामधे प्रवेश
नाथ आठवे वटसिद्ध नागनाथ जगी आले
दर्शन देता श्रीदत्तांनी ब्रह्मपरायण झाले || ८ |||
तृणामध्ये शिल्लक राही ब्रह्मदेव-अंश
पिप्पलायन नारायण त्यात करूनी प्रवेश
नववे नाथ चरपटीनाथ जगात अवतरले
होताच गर्व देवेंद्राला शासन त्या केले || ९ ||
मंत्र शाबरी नवनाथांनी केले संकलित
देव-दैत्य अन् भूत-पिशाच्चे पदि त्यांच्या विनत
जागृत स्थाने नवनाथांची भूमंडळि असती
शरण जाऊनी नवनाथांना साधुनि घ्या मुक्ती || १० ||
स्वामिनारायणांची आरती
या हो गुरुराज स्वामिनारायण |
वाट मी पाहतो डोळ्यांत आणुनी प्राण || ध्रु.||
आलिया गेलिया हाती धाडी निरोप |
छपैया गावी अवतरले माझे मायबाप || १ ||
भगवे वस्त्र कैसे गगनी झळकले |
सूर्यासम तेजस्वी माझे कैवारी आले || २ ||
स्वामींचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी |
स्वामींसी भक्त जीवे भावे ओवाळी || ३ ||
असो नसो भाव आलो तुमच्या पाया |
कृपादृष्टी पाहे मजकडे स्वामिराया || ४ ||
शुक्रवारच्या आरत्या
श्रीएकवीरा देवीची आरती
आरती एकवीरा | तूचि मायेचा झरा ||
वारुनी संकटांना | देसी भक्तां निवारा || ध्रु.||
पांडवांनी बांधियेले | तुझे मंदिर प्रशस्त |
अज्ञातवासामध्ये | त्यांना ठेवियले गुप्त || १ ||
संत एकनाथांची | तू कुलदेवता ||
कार्लागडी तुझा वास | तू रेणुकामाता || २ ||
वंद्य तू कोळियांना | तू शिवाची शक्ती ||
शुक्रवार साधूनीया | भक्त ओटी भरती || ३ ||
गुण तुझे गावयाला | नसे पामरा शक्ती ||
विनंती एक पायी | देई अनन्य भक्ती || ४ ||
श्री लक्ष्मीची आरती
येई ग लक्ष्मी माते माझे माऊली ये
माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनी, दोन्ही कर जोडुनी
तुझी वाट मी पाहे || ध्रु.||
आलिया गेलिया धाडी निरोप
धाडी निरोप
कोल्हापूरी आहे कोल्हापूरी आहे
माझी महालक्ष्मी माय || १||
साडी तांबडी कैसी गगनी झळकली
गगनी झळकली
ऐरावतावरी S ऐरावतावरी बैसूनी
माझी लक्ष्मीमाता आली || २||
लक्ष्मीमातेचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
नित्य दिपवाळी
लक्ष्मीमातेला भक्त S लक्ष्मीमातेला भक्त
जीवेभावे ओवाळी || ३||
असो नसो भाव आलो तुझिया ठाये
तुझिया ठाये
कृपादृष्टी पाहे कृपादृष्टी पाहे
मजकडे श्री लक्ष्मीमाये || ४||
श्रीजीवदानी देवीची आरती
जय देवी जय देवी जय जीवदानी |
आधार सर्वां तू विश्वाची जननी || ध्रु. ||
विरारनगरी दुर्गम गिरिस्थान |
शोधून पांडव करिती स्थापन |
एकवीरा योगलिंग नामे 'जीवधनी' |
झाली तू भक्तांची पुढे जीवदानी || १ ||
त्या स्थानी आदि शंकराचार्य आले |
माहात्म्य तुझे महारास कथिले ||
भक्तिभावे त्याने करिता सेवेस |
प्रसन्न होऊनीया दिला मोक्ष त्यास || २ ||
पुत्रहीन स्त्री शरण येता तुला |
तव कृपेने तिजला पुत्रलाभ झाला ||
करिता तुजला तांबूल दान |
प्रसन्न होऊनि करिसी वंशवर्धन || ३ ||
नवरात्री होई उत्सव थोर |
लोटे मंदिरी भक्तसागर ||
होवो तव भक्तीत मन माझे लीन
प्रसन्न होऊनी दे चरणांशी स्थान || ४ ||
शनिवारच्या आरत्या
श्री हनुमानाची आरती
आरती हनुमाना | सकलशक्तिनिधाना || ध्रु.||
होताच तुझा जन्म | केला महापराक्रम ||
उड्डाण नभी केले | आणि सूर्यास ग्रासिले || १ ||
सीतेचे रावण | जेव्हा करी हरण ||
सीतेला तू शोधून | केले लंकादहन || २ ||
मारुनी महिरावण | रक्षी रामलक्ष्मण ||
संजीवनी आणून | लक्ष्मणा देई जीवन || ३ ||
चिरंजीव तू भुवनी | येसी संकटी धावुनी ||
तुझ्यासम रामभक्ती | घडो हीच विनंती || ४ ||
शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३
Translations
Tralnslations
फुलपाखरू
Butterfly
Look at the lovely Butterfly !
Perched on the creepers and the flowers
Smiles with innocence, the Butterfly !
It flips and swings-
Its tiny blue and purple wings, the Butterfly !
It twinkles with ease,
Its beadlike eyes, the Butterfly !
When I go to catch it silently,
It flies away swiftly, the Butterfly !
God's Grandeur
कुसुमाग्रजांच्या कविता
English Translation
O Saibaba, I sing thy glory,
You make the living beings happy
At your feet, give a resting place to me-
-your humble servant and devotee || Re.||
Setting Kamdeva afire,
You remain tranced in your own Self entire
You reveal the Supreme Being
To the people salvation-seeking || 1 ||
You give realization to one
According to one's own perception
Such is your supremacy
You are the cloud showering mercy || 2 ||
Meditating your name constantly
Relieves one of the worldly misery
Profound is your action
You show the path to an orphan || 3 ||
In this Kaliyuga duration
You are the Brahman in action
You are the incarnation virtually
Of the Lord Datta Digambar holy || 4 ||
To have a glimpse of your feet
The devotees regularly meet
Every week on Thursday
To keep the day-to-day worries away || 5 ||
Serving the dust on your feet
Is my only treasure sweet
Allow me to do that for ever
You are one to whom the gods revere || 6 ||
I am a bird Chatak desirous
Of the clean water of own bliss
Give it to Madhav, your attendant
And fulfil your commitment || 7 ||
Hindi translation
आरति साईबाबा
जीवों के सौख्यदाता
चरणों में तुमरे
दास को दो शरण
भगत को दो शरण|| ध्रु.||
जलाकर अनंग
अपने रूप में दंग
मुमुक्षुओं को दिखाते
अपनी आँखों से श्रीरंग || १ ||
जिस का जैसा भाव
उसे वैसा अनुभव
देत तुम दयाघन
ऐसी तुमरी माया || २ ||
नाम-ध्यान तुमरा
हरै संसृतिव्यथा
अगाध तुमरी करनी
अनाथ को मार्ग दिखाए || ३ ||
कलियुग में अवतार
सगुणब्रह्म साचार
तुम हो अवतीर्ण
स्वामी दत्त दिगंबर || ४ ||
हर बृहस्पतिवार
आते भगत दर पर
देखके प्रभुपद
होवे भवभय दूर || ५ ||
मेरा द्रव्यभंडार
तुमरे चरणों की सेवा
यही हैं मांग मेरी
तुम्हे देवों के देवा || ६ ||
चाहे यह पंछी चातक
निजसुख का जल
पिलाकर माधव को
करो पूरा वचन || ७ ||
Gujarati translation
આરતિ સાઈબાબા
જીવો ના સૌખ્યદાતા
તમારા ચરણ માં
આપો દાસ ને શરણ
ભક્ત ને શરણ || ધ્રુ.||
બાળીને અનંગ
સ્વસ્વરૂપ માં દંગ
મુમુક્ષુઑ ને બતાડે
નિજ આંખોથી શ્રીરંગ || ૧ ||
જેના મન માં જેવો ભાવ
તેમને તેવો અનુભવ
આપે તમે દયાઘન
ઍવી તમારી માયા || ૨ ||
તમારા નામધ્યાન
હરે સંસૃતિવ્યથા
અગાઘ તમારી કરણી
માર્ગ બતાડે અનાથ ને || ૩ ||
કલિયુગમાં અવતાર
સગુણબ્રહ્મ સાચાર
અવતીર્ણ થયો છે
સ્વામી દત્તદિગંબર || ૪ ||
અઠવાડિયા ગુરુવારે
ભક્ત મળવા આવે
પ્રભુપદ જોઈને
ભવભય નિવારે || ૫ ||
મારો દ્રવ્યભંડાર
તમારી ચરણોની સેવા
એ જ માંગણી છે
તમને દેવાધિદેવ || ૬ ||
ઇચ્છા કરે દીન ચાતક
નિર્મલ તોય નિજસુખ
માધવ ને પીવડાવો
પૂરૂં કરો વચન || ૭ ||
Jingle bells
आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण
आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक ननअत्यं...
-
आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक ननअत्यं...
-
संक्षिप्त श्रीसाईसच्चरित शिर्डीत एक रोहिला | कुराणपठण करी || त्रासला गाव सारा | बाबा संतुष्ट तरी || अ.३ || नूर मुहम्मद जरी | जळी विसर्जन...
-
बालगीते मुलांच्या संगोपनामध्ये बालगीतांचे फार मोठे महत्त्व आहे. बालगीतांमधून मुलांचा प्रथम भाषेशी परिचय होतो. बालगीतांतून त्यांचे भाव विश...
























